मुंबई – आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ !

मुंबई – आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ !

मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन श्रेय लाटण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर या भागात नाट्यगृह आणि मंडई उभी राहत आहे. हा शिवसेनेच्या दावा तर भाजपने आमच्या सरकारमुळे झाल्याचा दावा केला आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो’, ‘जय शिवाजी जय भवानी’, अशा शिवसैनिकांनी  घोषणा दिल्या.

या प्रकल्पात ८०० आसनांचे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नाट्यगृह, सुमारे २१० विक्री गाळ्यांसह मंडई आणि बहुमजली निवासी इमारतीत ५३ सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १२२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मागील २५ वर्षे स्थानिक आमदार या नात्याने याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला असा शिवसेनेचा दावा आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठी रंगभूमी गाजवणारे आणि दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारे दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने याआधीच मंजूर केला आहे.

 

COMMENTS