विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान !

विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान !

धुळे – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ आज दुसऱ्या दिवशी धुळे इथं पोहोचली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.लोकांचे आशीर्वाद असतील तर मी निवडणूक लढवेन,’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकते दिले आहेत.
तसेच राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचे जे ठरलंय त्याप्रमाणे होईल. माझ्यासाठी ही फक्त तीर्थ यात्रा आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकीय नेते निवडणुकीनंतर लोकांना विसरतात मात्र आम्ही लोकांना विसरलो नाही, तसेच मी शिवसेनेसोबतच भाजपच्याही मतदारसंघात त्यांचा प्रचार करेन. कारण आमची युती अभेद्य आहे. इथं मी लोकांची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS