अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बारचा दिला आदित्य ठाकरेंनी नवा नारा !

अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बारचा दिला आदित्य ठाकरेंनी नवा नारा !

मुंबई – पेट्रोल दरवाढीवरून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारातल्या घोषणेची आठवण करून देत आदित्य ठाकरे यांनी, “अब की बार… नही करेंगे गलती बार बार…” असा नवा नारा दिला आहे.याबाबतचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंचं ट्वीट मुंबईत पेट्रोल ८४!! २०१४ चा प्रचार विसरलोच… “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार? https://twitter.com/authackeray/status/ असा सवाल आदित्या ठाकरे यांनी या ट्वीटमध्ये केला आहे. दरम्यान गेली काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडत असल्यामुळे सामान्य माणसांचं कंबरडं मोडलं आहे. हाच मुद्दा उचलून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS