औरंगाबाद – त्यामुळे आदित्य ठाकरेंनी महापौरांचं भाषण थांबवलं!

औरंगाबाद – त्यामुळे आदित्य ठाकरेंनी महापौरांचं भाषण थांबवलं!

औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महापौरांचं भाषण थांबवलं असल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अजान सुरु झाल्यानंतर महापौरांचं भाषण थांबवलं. आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडले यांचं भाषण सुरु होतं. यावेळी अजान सुरु झालं असता आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबवण्यास सांगितलं.

दरम्यान  हिंदुत्व आमची राष्ट्रीयता आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरेंकडून आम्हाला अजान सुरु असताना भाषण न करण्याची शिकवण मिळाली आहे, म्हणूनच मी महापौरांचं भाषण थांबवलं असल्याचं आदित्य.ठाकरे यांनी म्हटलं आहे.यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

COMMENTS