आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का ? उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया !

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का ? उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया !

मुंबई – युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक लढवण्याबाबत शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातलं नव्हतं त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेलं नाही. आदित्य सध्या तरी निवडणूक लढवणार नाही. पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही ते तो स्वत:हा आणि शिवसैनिक ठरवतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार असून एक ते दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या मुलाबरोबर मी इतरांच्या मुलाचेही लाड करतो. इतरांची पोर मी धुणी भांडी करण्यासाठी वापरणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

COMMENTS