मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत अवतरले ‘हिटलर’ !

मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत अवतरले ‘हिटलर’ !

नवी दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज खाकी शर्ट, दंडावर स्वस्तिक आणि हेल हिटलर म्हणत टीडीपीचे खासदार नारामल्ली शिवप्रसाद यांनी अनेक खासदारांना सॅल्यूट केला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून त्यांनी हिटलरचा पेहराव करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

दरम्यान एनडीएतून बाहेर पडलेल्यानंतर टीडीपीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकवेळा लक्ष्य केलं आहे. त्याचाच प्रत्यय आजही आला असून टीडीपीचे खासदार नारामल्ली शिवप्रसाद संसदेत हिटलरच्या वेशात अवतरले. व आध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान यापूर्वीही खासदार नारामल्ली शिवप्रसाद यांनी अनेक वेळा विविध वेशभुषेत मोदी सरकारचा निषेध केला आहे. परंतु यावेळी केलेला हिटलरचा पेहराव हा संसदेत चर्चेचा विषय ठरला होता.

COMMENTS