‘हा’ आहे देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक राजकीय पक्ष !

‘हा’ आहे देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक राजकीय पक्ष !

देशातल्या श्रीमंत राजकीय पक्षाच्याचं नावं ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. कारण हा पक्ष सत्ताधारी नाही तर चक्क विरोधी पक्ष आहे. सलग दुस-यांनादा तो सत्तेबाहेर फेकला गेला आहे. अंस असतानाही तो देशातला सर्वात श्रीमंत प्रादेशीक राजकीय पक्ष ठरला आहे. तामिळनाडूतील द्रमुक हा पक्ष देशात सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरला आहे. द्रमुकचं 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्पन्न हे 77 कोटी 63 लाख रुपये आहे.

तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुक हा दुस-या क्रमांकवर आहे. त्यांचं उत्पन्न हे 54 कोटी 93 लाख रुपये एवढं आहे. एडीआर अर्थात असोसिएशन ऑफ डेमॉक्रटीक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालानुसरा ही यादी देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील तेलगू देशम् हा तिस-या क्रमांकाचा श्रीमंत राजकीय पक्ष ठरला आहे. त्यांचे २०१५-१६ मधील एकूण उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते.

देशातील 47 प्रादेशिक पक्षांपैकी केवळ 32 पक्षांनी त्यांचे आर्थिक ताळेबंद निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. त्यानुसार ही यादी बनवण्यात आली आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पक्ष या सारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षांनी त्यांची आर्थिक माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही.

COMMENTS