15 डिसेंबरनंतर राज्य खड्डेमुक्त होणार – चंद्रकांत पाटील

15 डिसेंबरनंतर राज्य खड्डेमुक्त होणार – चंद्रकांत पाटील

सोलापूर –  15 डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी पंढरपूरमध्ये दिली. पावसामुळे रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 96 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर 15डिसेंबरनंतर एकही खडा दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील, असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजीनक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केल्याने त्यांचा दर्जा चांगला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबरनंतर राज्य खड्डे मुक्त होणार का ? याकडे सगळयांचे लक्ष लागून आहे.
आज कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. कार्तिकी यात्रेच्या सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

COMMENTS