श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी !

श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी !

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम विजयी झाला आहे. जवळपास दोन हजार मतांनी छिंदमनं विजय मिळवला आहे. सुरुवातीला श्रीपाद छिंदम पिछाडीवर गेला होता. परंतु अंतिम निकाल हातील आला असून छिदमनं याठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रीपाद छिंदमनं अपशब्दांचा वापर केला होता. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. श्रीपाद छिंदम हा भाजपाचा उपमहापौर होता. छिंदम याने 16  फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता.त्यामुळे या निवडणुकीत  छिंदम पराभूत होईल असा अंदाज मांडला होता परंतु या निवडणुकीत छिंदमनं विजय मिळवला आहे.

COMMENTS