राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या वैभव पिचड यांना धक्का!

राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या वैभव पिचड यांना धक्का!

अहमदनगर – राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आमदार वैभव पिचड यांना जोरदार धक्का बसला आहे.
अकोले येथील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे. पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे.आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी अकोले इथं मोर्चा काढला.

दरम्यान पिचड यांच्यावर आदिसवासींनी जमीन बळकावण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आज आदिसवासी बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्याप्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते. वैभव पिचड यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामाही सुपुर्द केला आहे.ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

तसेच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर मधुकर पिचड यांनी माझा कोणावरही राग नसून शरद पवारांची साथ सोडताना दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवारांना सोडून जाण्याचे दु:ख आहे. मात्र मतदार संघातील सामान्य जनता तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागत असल्याचं पिचड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS