राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार का?, जाहीर सभेत सुजय विखे म्हणाले…

राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार का?, जाहीर सभेत सुजय विखे म्हणाले…

अहमदनगर – काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेत त्यांचे चिरंजीव सुजय विखेंनी दिले आहेत. आज संगमनेर येथे पार पडलेल्या भाजपच्या सभेत सुजय विखे बोलत होते. आताच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या जिल्हाध्यक्षांना आम्ही भाजपमध्ये घेतलं असून माझ्या वडिलांनाही आम्ही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

दरम्यान सुजय विखे यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. तसेच आपली आगामी भूमिका येत्या 27 तारखेला म्हणजेच उद्या स्पष्ट केली जाणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विखे पाटील हे भाजपमध्ये जाण्याबाबतची भूमिका उद्या स्पष्ट करतील अशी माहिती आहे.

COMMENTS