सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी भाजपला देणार आणखी एक धक्का !

सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी भाजपला देणार आणखी एक धक्का !

अहमदनगर – महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत धक्का दिल्यानंतर राष्ट्रवादी भाजपला आणखी एक धक्का देणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील” असा दावा केला आहे. तर स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नसल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे नगरसेवक कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान नगरमध्ये सभापतीपदी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेतला. सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतल्याने कोतकर बिनविरोध निवडून आले. त्यानंतर आता नगरमध्ये राष्ट्रवादीकडून आणखी एक राजकीय भूकंप केला जाणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS