अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर, सर्वाधिक जागा जिंकुनही शिवसेनेला दिला शह!

अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर, सर्वाधिक जागा जिंकुनही शिवसेनेला दिला शह!

अहमदनगर – महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला शह दिला. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ३५ मतांची आवश्यकता होती. या निवडणुकीत भाजपला 37 मतं मिळाली. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला होता. परंतु महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला बाजी मारता आली नसल्याचं दिसून आलं आहे.

दरम्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांना भाजपाची १४, राष्ट्रवादीची १८, बसप ४ आणि अपक्ष १ अशी ३७ मते मिळाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. शिवसेनेचे उमदेवार बाळासाहेब बोराटे यांना २३ मते मिळणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांचा ३७ विरुद्ध ० मतांनी विजय झाला.

या निवडणुकीदरम्यान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला शिवसेना नगरसेवकांनी धक्काबुक्की केली आहे. छिंदम यांनी शिवसेनेला मतदान केल्याने शिवसेना नगरसेवक चिडले आणि यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत छिंदमला धक्काबुक्की केली असल्याची माहिती  आहे.

COMMENTS