अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, …तर भाजपसोबत युती करु – शिवसेना

अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, …तर भाजपसोबत युती करु – शिवसेना

अहमदनगर – अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती पहायला मिळत आहे. पहिल्या चार फे-यांनंतर  भाजप 14 तर शिवसेना 22, राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे़. मनसे १ व इतर तीन जागांवर आघाडीवर आहे़. त्रिशंकू होण्याच्या मार्गावर असून, हे कल असेच राहिले तर शिवसेना, भापजला युती करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे़. शहरातील भवानीनगर येथे मतमोजणी सुरु आहे़ मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी आहे़ आघाडी मिळाल्यानंतर कार्यकर्ते आपल्या नेत्याचा जयघोष करीत असल्याचे दिसत आहेत़.

भाजप 14

राष्ट्रवादी 20

शिवसेना 22

बसपा 4

काँग्रेस 5

इतर 2

सपा 1

अहमदनगरमध्ये शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष असून दिलीप गांधींना बाजूला ठेवलं तर भाजप सोबत युती करु असं वक्तव्य शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS