ते पाप झाकण्यासाठीच राष्ट्रवादीने भाजपपुढे लोटांगण घातले – शिवसेना

ते पाप झाकण्यासाठीच राष्ट्रवादीने भाजपपुढे लोटांगण घातले – शिवसेना

अहमदनगर – शिवसेनेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. केडगावमधील शिवसैनिकाची हत्या व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याचे पाप झाकण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर महापालिकेत भाजपापुढे लोटांगण घातले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये शिवसेनेविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत भाजपा- राष्ट्रवादी युतीवर टीका केली.

दरम्यान ज्यांनी स्वत:च्या पक्षाला व नेत्यांना फसवले ते शिवसेनेच्या त्रासामुळे भाजपाला पाठिंबा दिल्याचा खुलासा करत आहेत, हे शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र असून ते सहन केले जाणार नाही, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही राठोड यांनी दिला आहे. सत्तेसाठी हपापलेल्या सोयऱ्यांनी अनेक घरात भांडणे लावली, पक्षात फूट पाडली, प्रलोभने दाखवली, बुऱ्हाणनगरमधून सूत्रं हलवणारे भाजपासह सर्व पक्ष चालवत आहेत, मात्र ते सर्व एकच आहेत, हे महापालिका निवडणुकीत समोर आले असल्याची टीकाही राठोड यांनी केली आहे.

COMMENTS