मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात –अजित पवार

मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात –अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलत असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीसाहेबत तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात असा टोला लगावला आहे. विरोधकांच्या गोंधळादरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तावातावाने विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान मागील अधिवेशनाचा हवाला देत जर मुनगंटीवारांचा घसा बसला तर अर्थसंकल्प कोण मांडणार.मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता. तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटे काढले असल्याचं दिसून आलं आहे. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

COMMENTS