राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा !

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा !

मुंबई – राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळीत गोड खातं आलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत.मला अजूनही विश्वास बसत नाही की मी 1 लाख 65 हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. बारामतीच्या लोकांनी हे प्रेम दाखवलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

बैठकीपूर्वी अजित पवार यांनी यांनी एक सूचक विधान केलं आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रे पार्टी विरोधी पक्षातच बसणार असून भाजपा – शिवसेनेचे काय ठरलं त्यांनाच माहीत, आम्ही सरकारच्या चुका दाखवण्याचं काम करू असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS