सर्व बहिणींकडून अजितदादांना वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा ! VIDEO

सर्व बहिणींकडून अजितदादांना वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा ! VIDEO

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक नेत्यांनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अजितदादांना त्यांच्या लाडक्या बहिणींनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचं ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं असून आमचा दादा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व बहिणींनी एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या.सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे आम्ही सर्वजण एका ठिकाणी जमू शकलो नाही.त्यामुळे यावर्षी आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्स चा आधार घेतला असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांचा आज वाढदिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यासोबत गप्पा मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा असं ठाकरेंनी या फोटोसह कॅप्शन दिलंय.

 

तर, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

 

तसेच कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

COMMENTS