प्रिय अजित दादा, वाढदिवसानिमित्त बहिण सुप्रिया सुळेंकडून खास शुभेच्छा!

प्रिय अजित दादा, वाढदिवसानिमित्त बहिण सुप्रिया सुळेंकडून खास शुभेच्छा!

मुंबई – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांना बहिण खासदार सुप्रिया सुळे यांनी खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.’प्रिय अजित दादा, तुमचा आज वाढदिवस! तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रम देखील राबवले जात आहेत.

COMMENTS