मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, ‘या’ विषयावर झाली चर्चा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, ‘या’ विषयावर झाली चर्चा!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर काल संध्याकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा
झाली. तसेच आघाडीतल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती आहे. तसेच परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत पवारांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मुख्यमंत्र्यांनी मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार या मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

COMMENTS