…तर प्रकाश आंबेडकरांशी पुन्हा चर्चा करु, आघाडीबाबत अजित पवारांचं मोठ वक्तव्य!

…तर प्रकाश आंबेडकरांशी पुन्हा चर्चा करु, आघाडीबाबत अजित पवारांचं मोठ वक्तव्य!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झालंय. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आता ज्या जागांवर एकमत झालंय, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का? यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असं सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.तसेच शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

भाजप सरकार बनवाबनवी करत असून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बाधण्यामागे भाजपाचं राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो. असही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS