दिवसभराच्या प्रवासानंतरही अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा नाईट वॉक, तरुणांनाही लाजवेल अशी एनर्जी! VIDEO

दिवसभराच्या प्रवासानंतरही अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा नाईट वॉक, तरुणांनाही लाजवेल अशी एनर्जी! VIDEO

गुहागर – आज सकाळी रायगडावरील शिवरायांना मानवंदना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा दणक्यात सुरू झाली. रायगडावर या टोकावरून त्या टोकावर पायपीट करून दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तब्बल सहा किलोमीटरचा नाईट वॉक माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी केला. त्यामुळे तरुणांनाही लाजवेल अशी एनर्जी या नेत्यांमध्ये पहायला मिळाली.

लोकांची काम करत असताना स्वतः तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालण्याचा प्रयत्न करत असतो” असे वक्तव्य आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं. नाईट वॉक करताना माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजितदादा पवार यांनी देखील व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.

दिवसभर काम करून अजितदादा ज्या तडफेने चालत होते ते बघून भल्याभल्यांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला असे म्हणावे लागेल. दादांपेक्षा वयाने लहानांना धाप लागत होती पण विविध विषयांवर चर्चा करत दादा झपाझप अंतर कापत होते आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून धनंजय मुंडे चालताना अनेकजण येऊन दोघांशी संवाद साधत होते. देशात आणि राज्यात परिवर्तनाचा निर्धार करणारे दोघेही हसतमुखाने सर्वांशी संवाद साधताना बघून अनेकांनी आश्चर्यानी तोंडात बोट घातली नसती तर नवलचं!

COMMENTS