चार चाकी चालवताना ‘तीन चाकी’वर अजित पवार म्हणाले, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि साहेब एकत्र, आम्ही विश्वजीतकडे ! VIDEO

चार चाकी चालवताना ‘तीन चाकी’वर अजित पवार म्हणाले, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि साहेब एकत्र, आम्ही विश्वजीतकडे ! VIDEO

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विश्वजीत कदम यांना बाजूला बसवून गाडी चालवली. यावेळी पत्रकारांनी तीन चाकी सरकारबाबत प्रश्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गाडीत बरोबर घ्यायला पाहिजे होतं अस म्हटल्यानंतर यावर ते साहेबांच्या बरोबर आहेत, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि साहेब एकत्र आम्ही विश्वजित कडे आलो आहोत असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर दादा तीन चाकी पेक्षा 4 चाकी सोपी आहे चालवायला यावर अजित पवार लाजल्यासारखे हसले.

दरम्यान आज बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचं कार्यालय पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले. त्यानंतर फोटोसेशन झालं. तेव्हा, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

COMMENTS