…त्यामुळे तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते – अजित पवार

…त्यामुळे तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते – अजित पवार

पुणे, इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक येतात, तुमच्या येतात का? तुमच्या सभा ऐकायला लोकांनी आलं पाहिजे म्हणता, पण दुसर्‍यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. त्यामुळे तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात अजित पवार बोलत होते.

दरम्यान राज ठाकरे पाच वर्षापूर्वी आमच्याविरोधात सभा घ्यायचे, मोदींचे समर्थन करायचे, आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला का? ते कुठून पैसे आणतात विचारलं का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. परंतु आता दुसर्‍यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. त्यामुळे तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS