भाषण सुरु असताना मध्येच दारुडा बोलला, अजित पवार म्हणाले माझ्यासोबत पोलीस आहेत!

भाषण सुरु असताना मध्येच दारुडा बोलला, अजित पवार म्हणाले माझ्यासोबत पोलीस आहेत!

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण सुरु असताना मध्येच एक दारुडा बोलायला लागला. या दारुड्याला अजित पवारांनी आता माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलीस असतात, असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल सल्ला दिला. बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली.

दरम्यान अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनलसाठी जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांनाही गद्दारी केल्यास याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिला. मालेगाव कारखान्याचा अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. त्यांनी कारखाना आणि शिक्षण संस्थेचं वाटोळं केलं. मी मंत्री मंडळात असून तुमचा सहावा गट निर्माण करणार आहे. बारा जागा भरायच्या असून तो निर्णय घेणार आहे. त्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान करा.

तसेच मला बूथनुसार केलेलं मतदान कळणार आहे. दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं करणाऱ्यांची गंमत करेल. आता ऐकणार नाही. 30 वर्षे ऐकलंय. मी कुणालाही माफ करणार नाही. फोनचे रेकॉर्ड काढून चौकशी करणार आहे. माझा एनसीपी म्हणून मिरवणाऱ्यांनी गद्दारी केली तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

COMMENTS