हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करूनही माझ्यासमोरच डुलत डुलत आलाय – अजित पवार

हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करूनही माझ्यासमोरच डुलत डुलत आलाय – अजित पवार

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणादरम्यान
एक दारुडा त्यांच्यासमोरून गेल्याने त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. विशेष म्हणजे अजित पवार यावेळी
व्यसनाधीनतेवरच बोलत होते. त्यामुळे डोक्याला हात लावत ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही हे लोक सुधरायची नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता. इंदापूर तालुक्यातील काझड या गावातील कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांना एक निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात अवैध पद्धतीने होणारी दारूबंदी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर पवार यांनी या गावात दारू विकली जाते हे वाईट असून व्यसनाधीन होऊ नका असा सल्ला दिला. त्याचवेळी एक दारूडा डुलत डुलत चक्क मंचासमोरून निघाला. हे पाहताच अजित पवार यांना आश्चर्य वाटले.

त्या तळीरामाला बघत पवार यांनी ‘हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करून देखील माझ्यासमोरच हा डुलत डुलत आलाय. आता काय करायचं, कधी कधी वाटतं ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत, असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच यावेळी त्यांनी व्यसनाधीन होऊ नका असे सांगत स्वर्गीय आर आर पाटील यांचे उदाहरण देखील दिले .

याबाबतचा व्हिडीओ एबीपी माझाने ट्वीट केला आहे.

COMMENTS