मी नवख्याला आमदार करायचं ठरवलं तर करू शकतो, कुणाच्या बापाचं ऐकत नाही – अजित पवार

मी नवख्याला आमदार करायचं ठरवलं तर करू शकतो, कुणाच्या बापाचं ऐकत नाही – अजित पवार

वैराग – आपल्या पाठिंबाच्या जोरावर उमेदवार नवखा असला तरी मी आमदार करू करतो, यासाठी कुणाच्या बापाचं ऐैकत नाही.असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैराग येथे प्रचारसभेत बोलताना केला. बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैरागमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीहरी मोहीते हे होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी कुंकू एकाचच लावलेलं असावं बदलेलं बरं नव्हे, ज्यांना भरभरून देऊनही पवार साहेबांना सोडून गेली. ती तुम्हाला काय संभाळणार असा टोला दिलीप सोपल यांना लगावला.

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील,रेखा भूमकर,तेजस्विनी मरोड, शलाका पाटील,विकास पाटील, गोविंद पंके, विकास शिंदे, भूषण भूमकर, विक्रम सावळे, मधुकर जगदाळे, रमजान पठाण, श्रीधर कांबळे, दत्ता गाढवे ,कुमार पौळ आदी मान्यवर उपस्थित होते.विनोद बुद्धीने बोलून लोकांना फसवून आता पर्यंत राष्ट्रवादी काँगेसच्या माध्यमातून सत्ता उपभोगल्या आणि काहीही काम न करता जनतेला वेड्यात काढलं मात्र विनोद बुद्धीने बोलून लोकांना फसविण्यापेक्षा जनतेची कामे केली असती तर पक्ष बदलण्याची वेळ आली नसती असा टोला शिराळ्यातील भाषणाचे उदाहरण देवून अजित पवार यांनी दिलीप सोपल यांना लगावला.

या आजी माजी आमदारांना मतदानाचा दिवस जवळ आला की अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याची सवय आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता राष्ट्रवादी काँगेस पक्षाला मतदान करावे असे आवाहन उमेदवार निरंजन भूमकर यांनी केले. तसेच कारखान्याची बिले देतो देतो म्हणाऱ्यांनी आधी बिले द्यावीत, नुसत्या घोषणा करू नयेत. माझे गुरू आजोबा आणि वडील दोघेच असून तालुक्यात दुसरा कोणी गुरु नाही आणि मी कुणाचा शिष्य नाही, असे निरंजन भूमकर यांनी दिलीप सोपल यांना सुनावले आहे.

COMMENTS