…तर पवारांची औलाद सांगणार नाही, अजित पवारांची तब्बल सव्वा तास तुफान टोलेबाजी !

…तर पवारांची औलाद सांगणार नाही, अजित पवारांची तब्बल सव्वा तास तुफान टोलेबाजी !

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माळशिरस येथील वेळापूरमधील प्रचारसभेत सरकारवर तुफान टोलेबाजी केली आहे. या सरकारला शेतीचे काही कळत नाही. आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच सदाभाऊ खोत यांच्यावरही शेरेबाजी करत ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर हे पांघरून घालत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीने भाजपातून राष्ट्रवादीत आलेले उत्तम जानकर यांना माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. वेळापूर हे उत्तम जानकर यांचे गाव असल्याने याठिकाणी पहिली सभा घेण्यात आली. यावेळी मोठी गर्दी जमवत जानकर यांनी ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दाखवून दिलं आहे.

या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. 2009 च्या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. पण आता आम्ही तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे अडचण उरलेली नाही. ही निवडणूक फार महत्त्वाची असून प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. अच्छे दिनचे गाजर दाखाविणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला आणि तरुणांचा मोठा अपेक्षाभंग झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS