राष्ट्रवादीच्या  बैठकीत ‘या’ निर्णयाला अजित पवारांनी केला विरोध !

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘या’ निर्णयाला अजित पवारांनी केला विरोध !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, मधुकरराव पिचड, आमदार छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील या नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याला विरोध दर्शवला आहे.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बैठकीनंतर शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार, अशी चर्चा होती. परंतु या विलिनीकरणाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध केला आहे.
पक्षाचं स्वतःचं असं एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवेल, कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. आपल्याला आगामी विधानसभेला सामोरे जायचे आहे. लोकसभेचा काय निकाल लागला हे डोक्यातून काढा. आपला पक्ष आपला उमेदवार जनमानसात कसा पोहचेल यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या असे आवाहन पवार यांनी केले आहे.

COMMENTS