अशा चुकीच्या बातम्या आल्या तर कुणीतरी चावटपणा केला असं समजा – अजित पवार

अशा चुकीच्या बातम्या आल्या तर कुणीतरी चावटपणा केला असं समजा – अजित पवार

नाशिक, दिंडोरी – नाशिकमध्ये आज भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचं भूमिपजून केलं. या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात, अजित पवारांनी टोलेबाजी करत धमाल उडवून दिली. सकाळी 8 च्या आधी अजित पवारांनी दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं. यावेळी त्यांनी माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं त्यामुळे माफ करा. सकाळी इतक्या लवकर येईल की अशी चर्चा होती. मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

दरम्यान मराठी भाषा प्रत्येक माध्यमाच्या शाळेत बंधनकारक असणार आहे. मराठी भाषा प्रत्येकाला बोलता आली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे. कर्जमाफीच्याबाबतीत अर्थमंत्री म्हणून शेतकऱ्याला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. कर्ज फेडणाऱ्यांना देखील काहींना काही देण्याचा प्रयत्न असेल. आत्ता कर्जमाफी केलीय . पुढच्या वेळेला कमी व्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न करू. लवकर अर्थसंकल्प सादर करायचा आहे . गोरगरीब जनतेसाठी, अल्पसंख्याक वर्ग अशा सर्व घटकांना मदत करायची असल्याचं अजित पवार म्हणाले.

तसेच मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं असून अभ्यासात मुलींची संख्या जास्त असते. मुलांच मात्र लक्ष दुसरीकडे असतं. त्यांनीही इकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यसनांच्या बळी जाऊ नका.
सिगारेट, तंबाखू व्यसनांना बळी पडू नका. त्यामुळे रोगाला बळी पडावं लागतं. अलीकडे मैदान कमी होत चालले . खुप व्यायाम करा, खूप खेळा नीट राहा आणि फिट राहा इसा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, माझं आणि अशोक चव्हाण यांच भांडण झाले असे दाखवलं. हे सरकार टिकवण्यासाठी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे लक्ष ठेऊन आहेत. अशा चुकीच्या बातम्या आल्या तर कुणीतरी चावटपणा केला आहे असं समजा असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

COMMENTS