मनसे नेत्यावर अजित पवार भडकले,  म्हणाले…आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आलेत, लांबून बोला!

मनसे नेत्यावर अजित पवार भडकले, म्हणाले…आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आलेत, लांबून बोला!

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो covid सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. या दौऱ्यात सेंटरची माहिती घेण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनातील सुमारे 40 हून अधिक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.

दरम्यान यावेळी मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.
लांबून बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून अजित पवार भडकले होते. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. ते जवळ जाताच अजित पवारांनी
आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. जरा लांबून बोला असं म्हणाले. यावर अजित पवारांनी ऐकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं मनसेचे गट नेते तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.एव्हढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल त्यांनी केला.

अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला. मास्क लावलेला असल्याने नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. सोशल डिस्टसिंगबाबत त्यांनी दिलेल्या योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलं आहे. त्यामुळे चिखले यांची नाराजी दूर होणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS