मला ते उघडं करायला लावू नका, एकेकाळच्या कट्टर समर्थकाचा अजित पवारांना इशारा!

मला ते उघडं करायला लावू नका, एकेकाळच्या कट्टर समर्थकाचा अजित पवारांना इशारा!

मुंबई – विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे. यादरम्यान एकेकाळी अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आणि नुकतेच मंत्री झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.अजितदादा तुम्हीच मला रेटत-रेटत इथपर्यंत आणलं. मी आधी तुमच्यासोबतच होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ते उघडं करायला लावू नका,’ असा इशारा क्षीरसागर यांनी अजित पवारांना दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील विस्तारावरून सरकारला चिमटे काढले. आम्हाला वाटलं होतं कोल्हापूरचे क्षीरसागर मंत्री होती , पण झाले बीडचे. निष्ठावंत शिवसैनिकांनी काय सतरंजा उचलायच्या काय?’ असा खोचक सवाल करत अजित पवारांनी शिवसेनेवर टीका केली. या टीकेला जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.आहे.अजितदादा तुम्हीच मला रेटत-रेटत इथपर्यंत आणलं. मी आधी तुमच्यासोबतच होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ते उघडं करायला लावू नका, असं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS