उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे या क्षेत्राची  जबाबदारी सोपवणार?

उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे या क्षेत्राची जबाबदारी सोपवणार?

मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीपदं कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत.

दरम्यान काही साखर कारखान्यांच्या
हार्वेस्टिंग आणि इतर काही समस्या असल्यामुळे त्यासाठी निधीची गरज आहे. समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे. सहकार विभाग आणि साखर आयुक्त विभागाला एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोड झाली पाहिजे, कारखाने बंद पडू नयेत, कारण रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिकेचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्राचा अजित पवार यांनी आढावा घेतल्यामुळे
उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत.

COMMENTS