अजित पवारांची सावली म्हणून ओळखला जाणारा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी सोडणार?

अजित पवारांची सावली म्हणून ओळखला जाणारा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी सोडणार?

बारामती – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. परंतु आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता हिसकावून घेण्यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीत पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचे काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बारामतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण अजित पवारांची सावली म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते किरण गुजर हे पक्ष सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

किरण गुजर

दरम्यान पक्षातील काही लोक विविध मार्गातून आपल्याला कोंडीत पकडण्याचे काम करीत आहेत. मला वैयक्तिकरित्या लक्ष केले जात असल्याचा आरोप किरण गुजर यांनी केला आहे. या सर्व गोष्टीचा आता कंटाळा आला असून वेळ पडल्यास आपण नगरसेवकपदासह राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन वेगळा मार्ग निवडणार असल्याचं गुजर यांनी म्हटलं आहे. पक्षाने किरण गुजर यांच्या खांद्यावर निवडणुकीच्या खर्चाच्या कामासह इतर जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. परंतु गुजर यांनी पक्ष सोडला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच गुजर हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील चर्चा आहे.

COMMENTS