राष्ट्रवादीला आणखी एखादं मंत्रीपद  मिळू शकते, अजित पवारांचं सूचक विधान!

राष्ट्रवादीला आणखी एखादं मंत्रीपद मिळू शकते, अजित पवारांचं सूचक विधान!

पुणे – राष्ट्रवादीला अजून एखादं खातं मिळू शकते, थोडं थांबा असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गृह खात्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तसेच डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शहरांसाठी महत्त्वाचे गृहनिर्माण आपल्याकडे घेतलं आहे. सहकार आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणूनच राष्ट्रवादीकडे घेतलं आहे. थेट सरपंच निवड विकासाला अडचणीची त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो अर्थात आघाडीला विश्वासात घेऊनच करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा राष्ट्रवादीचा हा पहिलाच कार्यकर्ता मेळावा होता. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आयारामांना लगेच रेड कार्पेट नकोच. उगवत्या सूर्यांना नमस्कार करणारे भरपूर जण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यांना तपासूनच घेणार आहोत. काही लोकं तिकडे गेल्यानं पक्षाचं ओझं कमी झालं. साहेबांच्या सातारच्या सभेनं हवा झाली, ईडीने वातावरण बदललं. फडणवीसांना मी पणाचा फटका बसला असल्याचंही यावेळी अजित पवार म्हणाले.

COMMENTS