आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणतात…

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणतात…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, छन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवरही वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचां निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार हे उद्या संध्याकाळी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती. काल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता शरद पवार सोनिया गांधी यांनै दिल्लीला जाऊन भेटणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS