दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक, अजित पवारांचा कबुलिनामा!

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक, अजित पवारांचा कबुलिनामा!

मुंबई  – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करू नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करू नये, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती. त्यावर बोलताना अजित पवार यांनी बाळासाहेबांची अटक ही मोठी चूक होती असं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा बडा नेता कोण याबाबत चर्चा रंगली आहे..

COMMENTS