बारामती फलटण – लोणंद  रेल्वेच्या कामाला गती द्यावी –  उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती फलटण – लोणंद रेल्वेच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – बारामती फलटण – लोणंद या ६३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आज मंत्रालयात खासदार सुप्रियाताई सुळे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आयोजित बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला.

बारामती फलटण – लोणंद या एकूण ६३ किलोमीटरपैकी ३७ किलोमीटर रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जात आहे. त्यासाठीचे भूसंपादन, भूसंपादनासाठी उपलब्ध निधी आदीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात भूसंपादनासाठी २३९ कोटी रुपये आवश्यक असून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरीत भूसंपादन समन्वय व सामंजस्याने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

COMMENTS