जलयुक्त शिवाराचं बिंग फुटण्याच्या भीतीमुळेच दुष्काळग्रस्त गावामध्ये टँकर दिले जात नाहीत – अजित पवार

जलयुक्त शिवाराचं बिंग फुटण्याच्या भीतीमुळेच दुष्काळग्रस्त गावामध्ये टँकर दिले जात नाहीत – अजित पवार

चाळीसगाव –  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्हयासह राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परंतु सरकारनं त्याठिकाणी काहीच दिले नाही. तसेच जलयुक्त शिवाराचं बिंग फुटेल म्हणून दुष्काळग्रस्त गावामध्ये टँकर दिले जात नसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. चाळीसगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे, तुमचे आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली नसती. साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली असा सवालही अजितदादा पवार यांनी यावेळी केला.

तसेच भाजप सरकारने डान्सबारबाबतची बाजू कोर्टात नीट मांडली नसल्याने पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. भाजपाने हा काळा दिवस पाहायला लावला असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. आर.आर.आबांनी डान्सबार पुन्हा सुरु होणार नाही असा कायदा केला य. हा कायदा समाजाच्या भल्यासाठी, तरुण पिढीच्या भल्यासाठी केला असल्याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली आहे.

COMMENTS