बांधकाम मंडळात कोट्यवधींचा घोटाळा, अजित पवार यांचा कामगार मंत्र्यावर नाव न घेता आरोप !

बांधकाम मंडळात कोट्यवधींचा घोटाळा, अजित पवार यांचा कामगार मंत्र्यावर नाव न घेता आरोप !

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. बांधकाम मंडळामार्फत  5 हजार 185 रुपयांचे इसेंशियल किट आणि 5 हजार 258 रुपयांचे सेफ्टी किट खरेदीची 550 कोटींची निविदा काढण्यात आली असून या किटचा दर बाजारात 2 हजार रुपये आहे तर मध्यान्ह भोजन असे सर्व मिळून सर्व निविदा 2000 ते 2500 कोटींची आहे. त्यामुळे यामध्ये मोठा घोटाळा झाला असून बांधकाम कामगारांच्या निधीवर डल्ला मारण्याचं काम या विभागाचे मंत्री, आयुक्त करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे कामगार मंत्र्यांवर नाव न घेता गैरव्यवहाराचा आरोप  अजित पवार यांनी केला असून याआधी नोटीस दिली नसल्याने आपण नाव घेत नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गोयंका यांच्या कंपनीला हे काम दिलं गेलं असून गोयंका हे फसवणूक प्रकरणी पुण्यातील कारागृहात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच इतर साहित्य खरेदीतही गैरव्यवहार झाला असल्याचं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं असून बाजारातील दर आणि खरेदी दरातील तफावतची यादी यावेळी त्यांनी विधानसभेत वाचली.

दरम्यान हा मोठा घोटाळा असून खरेदी समितीला डावलून खरेदी करण्यात आली असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. तसेच भराष्टाचाराचा ठपका सीबीआयने ठेवलेल्या कंपनीलाच टेंडर देण्यात आलं असून  ज्या दराने वस्तू खरेदी झाल्या त्याचे बाजारातील दर कमी आहेत. त्यामुळे या गैरव्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान बांधकाम कामगार मंडळात 5 लाख चाळीस हजार कामगार नोंदणी असून 8 ते 9 हजार कोटींची ठेवी असल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे. यामध्ये बांधकाम कामगारांच्या ठेवी असून त्या खात्याचे आयुक्त, बडे ठेकेदार यांना मंत्र्याचा वरदहस्त आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

 

अजित पवार यांचे आरोप

  • मंडळाचे सात टेंडर काढले
  • 2500 कोटी टेंडर काढलं
  • सेफ्टी किट ,Essential किट किंमत बाजारात दोन हजार
  • 5 ते सव्वा पाच हजार किंमत देऊन टेंडर काढले
  •  ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला काम दिलं
  • खरेदी समितीला डावलून खरेदी करण्यात आली
  • भ्रष्टाचार सीबीआयने ठपका ठेवला तरी त्यांना टेंडर दिलं
  • ज्या रेटने वस्तू खरेदी झाल्या त्याचा मार्केट रेट कमी आहे
  • करोडो रुपयांचा घोटाळा

COMMENTS