फडणवीस आणि मी शेजारी बसून ‘या’ विषयावर चर्चा केली – अजित पवार

फडणवीस आणि मी शेजारी बसून ‘या’ विषयावर चर्चा केली – अजित पवार

बारामती – सत्तानाट्यानंतर काल पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे एकाच मंचावर आले होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं एका शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त दोघेही एकत्र आले होते. विशेष म्हणजे दोघंही एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

दरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय असं समजण्याचं कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्या गप्पा मारल्यात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.अजित पवार हे आज बारामतीत आहेत. बारामतीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. यावेळी ते बोलत होते.

तसेच ज्या बारामतीतील लोकांनी मला एक लाख 65 हजार मताधिक्‍याने निवडून दिलं त्यांची कामं मला करायची आहेत. कार्यकर्त्यांना वाटते मला उपमुख्यमंत्री करावं पण ठरवण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS