तुम्हाला कोणी विचारलंय तुमचा देठ कसा आहे ?, अजित पवारांचा गिरीश बापटांवर निशाणा !

तुम्हाला कोणी विचारलंय तुमचा देठ कसा आहे ?, अजित पवारांचा गिरीश बापटांवर निशाणा !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘माझा देठ हिरवा आहे, असं बापट म्हणतात. त्यांना कोणी विचारले का तुमचा देठ कसला आहे, असा निशाणा अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्यावर लगावला आहे. तरूणांशी बोलताना बापट म्हणतात, तुम्ही रात्री जे पाहता ते मीही पाहतो. आता सांगा विद्यार्थी रात्रीचे काय पाहतात? अभ्यास करतात. हे काय अभ्यास करतात का? सुसंस्कृत पुण्याचे पालकमंत्री तारतम्य सोडून बोलतात, हे यांना चालते का? अशी बोचरी टीका ही अजित पवारांनी केली आहे. ते बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान राफेल मुद्द्यावरून अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राफेलबाबत सर्व माहिती समोर आली पाहिजे. परंतु ती लपवण्यासाठी सीबीआयच्या अधिकार्‍यांचीच रात्रीच्या दोन वाजता बदली केली जात असल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

 

COMMENTS