हे कुठलं सोमटं आलंय, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर पलटवार !

हे कुठलं सोमटं आलंय, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर पलटवार !

जळगाव – पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू असं वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे.ये बारामतीमध्ये बघतोच तुला… ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय असा निशाणा अजित पवार यांनी महाजनांवर साधला आहे.

दरम्यान भाजप सरकारकडून लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. तसेच महापुरुषांच्या स्मारकांचे काम थांबवले जाते आणि दुसरीकडे डान्सबार सुरु करण्याचा निर्णय होतो. हाच का भाजपाचा कारभार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

COMMENTS