गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांनीही सोडलं मौन !

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांनीही सोडलं मौन !

सातारा – भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे.आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली आहे. साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्ताने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पडळकरांवर टीका केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असो ते गप्प बसत नाहीत, ते सदैव काम करत असतात. संकट काळात या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. परंतु लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं. याशिवाय त्यांना जनतेनं जागा दाखवली आहे. एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS