भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांवर अजित पवारांचा अप्रत्यक्ष निशाणा!

भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांवर अजित पवारांचा अप्रत्यक्ष निशाणा!

पुणे – भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत. अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता,’ असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी फटकारलं आहे.
आम्ही हर्षवर्धन पाटील यांना 50 ते 55 फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, असा पलटवार अजित पवार यांनी केला आहे.

COMMENTS