मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कोणी सांगितलं होतं?, सभागृहात अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले !

मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कोणी सांगितलं होतं?, सभागृहात अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले !

नागपूर – राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे आज सभागृहात आपल्याच सरकारवर संतापले आहेत.
एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधकांच्या आरोपावरून अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले होते.
सहापैकी एक तरी मंत्री सभागृहात पाहिजे, मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका अस कोणी सांगितलं होतं असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर अखेर 10 मिनिटांसाठी विधानसभा सभागृह तहकुब करण्यात आले.

दरम्यान शेतकय्रांना दिलासा दिला जाईल, शेवटच्या दिवशी सकारात्मक निर्णय घेतील असं कालच अजित पवार यांनी म्हटलं होतं. विदर्भात अधिवेशन असल्याने इथले शेतकरी आणि राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंतची परंपरा आहे. शेवटच्या दिवशी पॅकेज जाहीर होतंय का याबाबत लोकांमध्येही उत्सुकता आहे .आमच्या पक्षात कुणाला जबाबदारी द्यायची हा निर्णय आमचे नेते शरद पवार घेतात. ते जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS