पार्थ पवार लढवणार विधानसभेची निवडणूक?,  अजित पवार म्हणतात…

पार्थ पवार लढवणार विधानसभेची निवडणूक?, अजित पवार म्हणतात…

पुणे – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
यावर स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पक्षात बळजबरी करत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानसभा जागा वाटपाबाबत आघाडीत फार काही अडचण येणार नाही. सकारात्मक चर्चा झाली आहे. काही जागांची अदला-बदल होईल,’ अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आता विधानसभेच्या तयारी सुरू झाली आहे, या निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS