ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, पार्थ पवारांच्या ट्वीटवर अजित पवारांची प्रतिक्रिया!

ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, पार्थ पवारांच्या ट्वीटवर अजित पवारांची प्रतिक्रिया!

पुणे – ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पार्थ पवार यांच्या ट्वीटवर केलं आहे. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला. त्याबाबत विचारले असता प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो असं सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS