मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आणि आम्ही पांडू हवालदार व सोंगाड्या – अजित पवार

मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आणि आम्ही पांडू हवालदार व सोंगाड्या – अजित पवार

बारामती – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आणि आम्ही म्हणजे पांडू हवालदार व सोंगाड्या असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. तसेच मोदी साहेब तुम्हाला न्याय देवू शकत नाहीत संसारी माणूसच तुम्हाला न्याय देवू शकेल,  गळ्याच्यान खोट बोलत नाही, जो संसारच करू शकत नाही त्याला महागाईची परिस्थिती काय समजणार असा टोला अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. ते बारामती येथील सभेत बोलत होते.

तसेच एकटा जीव सदाशिव असा दादा कोंडकेचा चित्रपट होता तशी स्थिती मोदींची आहे. आम्ही झालुय पांडु हवालदार, सोंगाड्या सारखी आमची गत झालीय असल्याचं अजितदादांनी म्हणटले यावर सभेत जोरदार हशा पिकला असल्याचं पहावयास मिळालं.

तसेच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील विळ्या भोपळयाचे वैर आख्य्या महाराष्ट्राला न्यात आहे अजित पवारांचे जवळचे व सध्याचे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात इंदापूर तालुक्यातील कालव्यातून पाणी आणण्यावरुन नेहमीच एकमेकांविरूध्द आरोप प्रत्यारोप होतात हाच पाण्याचा मुद्दा घेत आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री होतो   पण हे (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता ) पाणी आणल्याचा दावा करतात हा त्यांचा दावा साफ चुकीचा असल्याचंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आईजीच्या जीवावर बाईजी उदार असल्याचा टोला अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लगावला आहे.

COMMENTS