पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता, काही चुका झाल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली !

पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता, काही चुका झाल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली !

पुणे – पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सोई-सुविधांवर येणारा ताण पाहता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती असल्याचं अजित पवार म्हणालेत.

दरम्यान अनेक लोकप्रतिनिधी कोरोना बाधीत झालेत. साथ वाढतेय हे वास्तव. संख्या लाखावर गेली असली तरी 82 हजार कोरोना मुक्त हे पण सांगितलं गेलं पाहिजे.पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती पण पुणातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवलं. तसेच ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS